#coronavirus_MH – २७ मे आजची आकडेवारी..! २१९० ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात बुधवारी संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा १८९७ वर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी ९७ रुग्णांचा मृत्यू झाला.

बुधवारी सर्वात जास्त ३३ मृत्यू एकट्या मुंबईत झाले. तर, ठाण्यात १६, जळगाव १०, पुणे ९, नवी मुंबई आणि रायगड ७-७, अकोला ६, औरंगाबाद ४, नाशिक आणि सोलापूर ३-३, सातारा २ मृत्यू झाले. यासोबतच अहमदनगर, नागपुर, नंदुरबार, पनवेल आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७२ पुरुष आणि ३३ महिला आहेत. यात ६३% रुग्णांना डायबिटीज, हाय ब्लडप्रेशर आणि ह्रदयरोगासारखे आजार होते.

राज्यातील संक्रमितांचा एकूण आकडा ५७ हजारांच्या जवळ

चिंतेची बाब म्हणजे, राज्यातील संक्रमितांची संख्या वेगाने वाढत आहे. आज २१९० नवीन रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसोबत राज्यातील एकूण आकडा ५६९४८ वर पोहचला आहेत. यापैकी ३७१२५ अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

महत्वाचे : ७०-८०% रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत

महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी अजोय मेहता यांनी सांगितले की, राज्यात ७०-८० रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीयेत. तर, संक्रमितांचा डबलिंग रेट ३ दिवसावरुन १४ दिवसांवर आला आहे. मेहता यांनी पुढे सांगितले की, पूर्वी राज्यात दोनच टेस्टींग लॅब होत्या. पण, आता राज्यात ७२ टेस्टींग लॅब आहेत.

राज्यात २४ तासांत ८० पोलिस कोरोना पॉझिटिव्ह, २ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आणखी ८० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत १८८९ कोरोना रुग्ण पोलिस कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत. तर आतापर्यंत २० पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २ दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांशी संबंधित १३ केस सध्या अॅक्टिव्ह आहेत, तर ८३८ पोलिस कर्मचारी बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *