#coronavirus_MH – ८ मे आजची आकडेवारी..!| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल १०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९०६३ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात ३७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २५ जण मुंबईचे तर पुण्यातील १०, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर १९०६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून १३ हजार ४९४ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत ३३०१ कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरूष तर १८ महिला आहेत. त्यातील १७ जण हे ६० वर्षापुढील वयोगटातील आहे. १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ४ रुग्ण ४० वर्षाखालील आहे. ३७ रुग्णांपैकी २७ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 12142 374 462
पुणे (शहर+ग्रामीण) 2048 125 136
पिंपरी चिंचवड मनपा 125   3
ठाणे (शहर+ग्रामीण) 825 36 10
नवी मुंबई मनपा 716   4
कल्याण डोंबिवली मनपा 284   3
उल्हासनगर मनपा 15   0
भिवंडी निजामपूर मनपा 21   2
मीरा भाईंदर मनपा 192   2
पालघर 46 1 2
वसई विरार मनपा 194   9
रायगड 81 5 1
पनवेल मनपा 132   2
नाशिक (शहर +ग्रामीण) 107 2 0
मालेगाव मनपा 450   12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 53 16 2
धुळे 32   3
जळगाव 96 1 14
नंदूरबार 19   1
सोलापूर 185   10
सातारा 94 3 2
कोल्हापूर 16 2 1
सांगली 35 27 1
सिंधुदुर्ग 5 1 1
रत्नागिरी 17 2 1
औरंगाबाद 423 14 12
जालना 12   0
हिंगोली 58 1 0
परभणी 2   1
लातूर 25 8 1
उस्मानाबाद 3 3 0
बीड 1   0
नांदेड 32   2
अकोला 121 1 10
अमरावती 80   11
यवतमाळ 95 8 0
बुलडाणा 24 8 1
वाशिम 1   0
नागपूर 212 12 2
भंडारा 1   0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 4 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 34   8
एकूण 19063 3470 731

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *