#coronavirus_MH – ९ मे आजची आकडेवारी..!



मुंबई : राज्याने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज 1165 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हजाराच्या घरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार 228 इतकी झाली आहे. तर, एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आज झाली. आज तब्बल 48 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात 3800 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार 804 नमुन्यांपैकी 2 लाख 6 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 20 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 290 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई12864374489
पुणे (शहर+ग्रामीण)2093125146
पिंपरी चिंचवड मनपा1323
ठाणे (शहर+ग्रामीण)9103610
नवी मुंबई मनपा7894
कल्याण डोंबिवली मनपा3163
उल्हासनगर मनपा200
भिवंडी निजामपूर मनपा212
मीरा भाईंदर मनपा2012
पालघर3212
वसई विरार मनपा2169
रायगड8951
पनवेल मनपा1372
नाशिक (शहर +ग्रामीण)12320
मालेगाव मनपा47220
अहमदनगर (शहर+ग्रामीण)60162
धुळे503
जळगाव133114
नंदूरबार191
सोलापूर19010
सातारा9832
कोल्हापूर1921
सांगली35271
सिंधुदुर्ग511
रत्नागिरी1821
औरंगाबाद4421412
जालना120
हिंगोली5810
परभणी21
लातूर2581
उस्मानाबाद330
बीड10
नांदेड333
अकोला143111
अमरावती8212
यवतमाळ9580
बुलडाणा2481
वाशिम10
नागपूर224122
भंडारा10
गोंदिया110
चंद्रपूर410
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)358
एकूण202283800779
आजची आकडेवारी..

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1243 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 388 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *