#coronavirus- आजची कोरोना आकडेवारी..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात ५५२ नवे कोरोना पॉझिटिव्हि रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५२१८ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण ७२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एकूण १५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एकट्या मुंबईत आज ४१९ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण १९ मृत्यूपैकी १२ जण मुंबईतील आहेत. पुण्यातील तीन, पिंपरी आणि सांगलीतील एक आणि ठाण्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. कोरोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या २५१ झाली आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *