#coronavirus- आजची कोरोना आकडेवारी..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.

| मुंबई | आज महाराष्ट्रात ७७८ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६ हजार ४२७ वर गेली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ८ हजार ७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात १४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदुरबार येथे १ आणि धुळे येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या १४ रुग्णांपैकी ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *