#Coronavirus : उध्दव ठाकरे Live


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १९ एप्रिल, रविवार 

मुंबई : आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित केले. यातून त्यांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा बळ, आत्मविश्वास दिला आहे. 

त्यांचे आजचे महत्वाचे मुद्दे..!

  • पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
  • २० तारखेपासून मोजक्या उद्योगांना परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. रेड झोनमध्ये पुर्णपणे ठप्प राहणार आहे. मात्र, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये मोजक्या उद्योगांना परवानगी देण्यात येणार..
  • महाराष्ट्रात ६६ हजार ७९६ टेस्ट केल्या आहेत त्यात ९५% लोक निगेटिव्ह आल्या आहेत. राज्यात ३६०० जण कोरोना बाधित आहेत त्यातील ३५० लोकांना बरं करून घरी सोडले आहे.
  • कोणतेही लक्षण लपवू नका, दुर्लक्ष करू नका, कोरोनाचे रुग्ण गंभीर स्थितीतही बरे होऊन परत जात आहेत. लक्षण आढळल्यास समोर या आणि लवकरात लवकर उपचार करून घ्या..
  • घरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात मी अशा घटना खपवून घेणार नाही. महिलांनी गरज पडल्यास १०० नंबरवर फोन करून तक्रार करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
  • आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहे. पण न दिसणाऱ्या शत्रूशी आपला लढा सुरू आहे.
  • शत्रू समोर असता तर एक घाव दोन तुकडे केले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *