चीन विरोधात देश एकवटले, नवा गट स्थापन..!

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरस, दक्षिण चीन महासागर आणि हाँगकाँगसारख्या प्रकरणावरून चीन सध्ये सर्वच देशांच्या निशाण्यावर आहे. तर दुसरीकडे लडाखजवळ असलेल्या भारत चीन या दोन्ही देशांच्या सीमेवरूनही चीनच्या कुरापती सुरू आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेसमवेत ८ देशांनी चीनची उपस्थिती ही जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांसाठी धोकादायक असल्याचं सांगत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायना (IPAC) हे बनावट असल्याचं चीनमध्ये म्हटलं जात आहे. २० व्या शतकाप्रमाणे आता चीनला त्रास देणं शक्य नाही आणि पश्चिमी देशांच्या नेत्यांनी कोल्ड वॉरच्या विचारातून आता बाहेर पडलं पाहिजे, असं चीननं म्हटलं आहे.(countries against china)

शुक्रवारी इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाची (IPAC) स्थापना करण्यात आल्याचं ब्लूमबर्गच्या एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे.  यामध्ये अमेरिका, जर्मनी, ब्रिटेन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि यूरोपच्या संसदेचे सदस्य सहभागी आहेत.  चीनवर टीका करणारे आणि अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर मार्को रुबियो इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाचे सह-अध्यक्ष आहेत.

कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत चीन जागतिक आव्हान उभे करत असल्याचे रुबिओ यांनी म्हटलं आहे. चीनच्या विरोधात उभं राहणाऱ्या देशाला कायम असं एकट्यानं करावं लागतं आणि त्याची मोठी किंमतही फेडावी लागते, असं इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाचं म्हणणं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर चीन आणि अमेरिकेतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच त्याचा परिणाम व्यापार आणि पर्यटनाच्या संबंधांवरही दिसू लागला आहे.(countries against china)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *