| जालना / प्रतिनिधी | काल दि २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जालना तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. मंगेश जैवाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये डी सी पी एस धारक म्हणजेच नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू असलेल्या शिक्षक सभासदांना जुनी पेन्शन नाही. अशातच एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबाची वाताहात होते आणि त्यासाठी पतसंस्थेतर्फे सानुग्रह निधी म्हणून १० लक्ष रुपये देण्यात यावा तसेच सदर सभासदांचा १० लक्ष रुपयांचा सामूहिक विमा उतरवून दुर्दैवाने एखादा कर्मचारी मयत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एकूण २० लक्ष रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी याद्वारे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश जैवाळ यांनी विद्यमान संचालक मंडळ डी सी पी एस धारक शिक्षक सभासदांच्या प्रश्नी संवेदनशील असून संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री. मंगेश जैवाळ, संचालक तथा समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री. अरुण जाधव सर, संस्थेचे माजी चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्याध्यक्ष श्री. बाबुराव पवार सर ,श्री. लक्ष्मण राठोड सर, अर्जुन पवार सर, सुभाष जाधव सर यांच्यासह महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्यप्रसिद्धीप्रमुख संतोष देशपांडे, संचालिका तथा जालना जिल्हा महिला आघाडी प्रमुख कल्पना खंडागळे, रामराजे हेगडकर यांची उपस्थिती होती.