राहता तालुका स्वराज्य मंडळ अध्यक्षपदी दीपमाला सातपुते-सोनवणे यांची एकमताने निवड..

| राहता / विशेष प्रतिनिधी | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या रणांगणात नव्याने पदार्पण केलेल्या स्वराज्य मंडळाने नवनवीन प्रयोग करत आपले पाय घट्ट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आज गुगल मीट या ऑनलाइन ऍप द्वारे तालुक्यातील बहुतांश शिलेदार ऑनलाईन मीटिंग मध्ये भाग घेत, सर्वांची मते मतांतरे घेत, अखेर चळवळीच्या दृष्टीने पुरोगामी भूमिका घेत स्वराज्य मंडळाने नावाला साजेल अशी कृती पुन्हा एकवार केलेली आहे. सौ. दीपमाला सातपुते-सोनवणे यांना तालुका अध्यक्षपदी नेमणूक देत नव्याने मंडळाला झळाळी प्राप्त होईल असा विश्‍वास यावेळी प्रत्येकाने व्यक्त केलेला आहे.

“प्रत्येक वेळी चुका सांगून फायदा नसतो, झालेल्या चुका दुरुस्त करण्याची हिंमतही आपण ठेवली पाहिजे” या वाक्याने आदरणीय दीपाताई यांनी स्वराज्य मंडळाचे अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली. यातूनच त्यांची सर्व भूमिका स्पष्ट झाली. यापुढे आजवर गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात बँकेच्या राजकारणात झालेल्या किंवा राहून गेलेल्या बऱ्याचशा गोष्टी स्वराज्य मंडळ पूर्णत्वास येईल, याबाबतचा विश्वास प्रत्येक शिलेदार यांनी व्यक्त केला.

स्वराज्य मंडळाची स्थापना त्याची भूमिका व पुढील वाटचाल सांगणे करिता गुगल मीट द्वारे नेते बाजीराव मोढवे, अध्यक्ष सचिन नाबगे, ज्ञानेश्वर सोनवणे, केशव कोल्हे, योगेश थोरात, राजू चव्हाण, राजेंद्र ठोकळ, प्रतीक नेटके, मच्छीन्द्र भापकर, एकनाथ रहाटे , वृंदाताई तेलोरे-बोऱ्हाडे मॅडम उपस्थित होते. स्वराज्य मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पटारे व तालुका नेते किशोर जगताप यांनी कार्यकारणी जाहीर करत या तालुक्यातून निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदानाचे दान आपल्या पारड्यात पडेल याचा विश्वास व्यक्त केला.

आज निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

•अध्यक्ष- दिपमाला सातपुते सोनवणे
•सरचिटणीस- रंगनाथ देठे सर
•कार्याध्यक्ष- राहुल लिमकर सर
•कोषाध्यक्ष- संदीप गाढे सर
•कार्यालयीन चिटणीस- लक्ष्मण तांबे, कनिफ बोऱ्हाडे, मधुकर सगभोर, वंदना घाडगे मॅडम
•सहकार्याध्यक्ष- अंबादास अहिरे, संतोष लहानगे, ब्रम्हकुमारी राजगुरू मॅडम, श्रुती ठुबे मॅडम,
•सहसरचिटणीस- गणेश अंत्रे, बालाजी आईंदवाड सर, सुरेखा क्षीरसागर मॅडम
•उपाध्यक्ष- अनिल धिरडे, वामन पवार, राजश्री बोऱ्हाडे मॅडम इजाज शहा सर
•प्रसिद्धी प्रमुख- योगेश भगत, कांतीलाल जगताप, ज्ञानोबा गाल्डे
•संपर्कप्रमुख- अशोक गोपाळ,मोहन रोकडे,दिलीप साळी, प्रवीण दिघे,
•तालुका संघटक -पांडुरंग सदगीर,गंगाराम कडाळे, पंकज शिंदे
•जिल्हा प्रतिनिधी- कचरे सर,
•उच्चाधिकार समिती-विवेक गिरी, संतोष बोडखे, चांगदेव चव्हाण, राजू बनसोडे.

आजच्या ऑनलाइन सभेला तालुकाभरातून सतीश पटारे, किशोर जगताप, चांगदेव डोंगरे, चांगदेव चव्हाण, योगेश भगत, एजाज शाह सर, बालाजी आईंदडवाड, वैभव गोसावी, राहुल पुरी, ज्ञानोबा गाल्डे, व्यंकट जाधव, कानिफ बोराडे, विवेक गिरी, राहुल लिमकर, वंदना घाडगे मॕडम , दीपमाला सातपुते, सुरेखा क्षिरसागर, अनिल धिरडे , गंगाराम कडाळे, किशोर कुऱ्हे, रंगनाथ देठे, अंबादास अहिरे, लक्ष्मण चंदावाड, लक्ष्मण तांबे, ब्रम्हकुमारी राजगुरू, दिलीप साळी, गणेश अंत्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *