काल तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान..!

| पुणे | जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३५ वा पालखी प्रस्थान सोहळा यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र सर्व प्रथा परंपरांचे पालन केलं जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह तहसीलदार आणि मानाच्या ५० वारक-यांच्या उपस्थितीत काल या सोहळ्याला सुरुवात झाली. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करत वारक-यांनी टाळ मृदुगांचा तालावर ठेका धरला. मोजक्याच वारक-यांसोबत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमली. मोजके वारी विवेकाची पताका खांद्यावर घेत, वारीची परंपरा जपताना दिसत आहेत.

दरवर्षी इंद्रायणीचा काठ हा लाखो वारक-यांनी गजबलेला असतो. इंद्रायणीत स्नान करत विठूनामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात. पण वारक-यांनी गजबलेला इंद्रायणीचा घाट यंदा शांत आहे. कोरोनाच्या सावटामुळे पायी वारी सोहळा होणार नसल्यानं वारक-यांच्या मनात दु:ख आहे. मात्र, वारकरी संप्रदाय हा कायम विवेकाची कास जोपासत आला आहे. त्यामुळं यंदा सगुण वारकरी करण्याऐवजी वारक-यांनी निर्गुण वारी करत एक झाड लावून पर्यावरण रक्षण करावं, असं आवाहन सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *