पालघर घटनेला दिलेला जातीय रंग दुर्दैवी – गृहमंत्री अनिल देशमुख.
या प्रकरणातील १०१ आरोपींची नावे जाहीर..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल.

| मुंबई | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, घटनेनंतर गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तिथून त्यांना ताब्यात घेतलं. त्या १०१ जणांची यादी आज जाहीर करणार आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

यावेळी देशमुख यांनी सांगितलं की, पालघरच्या घटनेत एकही मुस्लीम नव्हता. ही घटना घडत असताना काही जण ‘ओये बस’, ‘ओये बस’ असं म्हणत होते. त्या ऐवजी शोएब असं बोललं जात असल्याचा गैरसमज पसरवण्यात आला. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज संपूर्ण यंत्रणा कोरोनाशी लढत असताना त्यात जातीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला गेला. आज ती वेळ नाही. एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे, असं ते म्हणाले.

यावेळी अनिल देशमुख यांनी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंतीही केली. सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करण्याची गरज असताना काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने बघत आहेत असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी नाव न घेता भाजप नेत्यांना लगावला आहे.

आरोपींची नावे त्यांनी ट्विट करून सांगितली आहेत: 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *