अकोले तालुक्यात अहमदनगर जिल्हा प्राथ. शिक्षक स्वराज्य मंडळाची ऐतिहासिक कृती, तालुकाध्यक्ष पदी महिला विराजमान..!

| अहमदनगर | नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा चळवळीचा तालुका आहे असे म्हणतात आणि याचीच परिणिती स्वराज्य मंडळाच्या शिलेदारांनी एक वेगळा इतिहास घडवून दिली आहे. आज पर्यंत विविध संघटना व मंडळे यामध्ये महिलावर्ग हा महिला आघाडी या पर्जन्यछायेच्या भागात वावरत असे, त्यांच्यातून त्यांची स्वतःची किती सावली निर्माण झाली, हा गेल्या शंभर वर्षातला यक्षप्रश्न ठरेल. परंतु शिक्षक बँकेच्या शतकी महोत्सवात नव्या विचाराने ठामपणे जिल्ह्याच्या शिक्षकी राजकारणात उभे राहिलेल्या स्वराज्य मंडळाला जणू काही यानिमित्ताने जिजाऊची लेकच लाभली आहे. काल करण्यात आलेल्या निवडी ह्या कधीतरी या शिक्षकी राजकारणात एका महिलेने पुरुषांसह सर्वांचेच नेतृत्व करावे असा विचार रुजवण्याचे ऐतिहासिक पाऊल ठरले.

अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेची रणधुमाळी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. यासाठी सर्वच मंडळांनी कंबर कसलेली दिसत आहे, परंतु यंदा सर्वाधिक बोलबाला स्वराज्य मंडळाचा राहील असे एकंदर त्यांच्या खेळी वरून वाटते. नव्याने पाऊल टाकलेल्या या मंडळाच्या शिलेदारांनी बिना सावळे या एका ज्येष्ठ महिलेची अध्यक्षपदी निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आजवर अनेक दिग्गज व मातब्बरांना न जमलेले कार्य या तरुण शिलेदारांनी केलेले आहे. या साठीच अध्यक्ष बिना सावळे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षकी राजकारणात थेट अध्यक्षपदाची भूमिका बजावणे ही इतकी सोपी गोष्ट नाही परंतु हे शिवधनुष्य पेलण्याचे धाडस करणे हे देखील सावित्रीच्या पावलाप्रमाणे एक अंशतः पाऊल ठरेल.

आजपर्यंत महिला शिक्षिका या राजकारणातून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कुरघोडी, चांगल्या-वाईट खेळी या पासून बचावासाठी कायमच दूर राहत होत्या परंतु जिल्हाभरात जवळजवळ निम्मा मतदार असलेला हा घटक कायमच वंचित राहिला.

केवळ आरक्षण आहे म्हणून एखादी जागा सोडणे आणि तीही मातब्बर नेत्यांच्या नातेवाईकांना मिळणे हा आजपर्यंतचा पायंडा सर्वसामान्य शिक्षकांनी पाहिलेला आहे, परंतु स्वराज्य मंडळाने कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली, एक चांगला जनसंपर्क आणि आदर्श शिक्षिका असण्याचे अनेक पुरस्कार प्राप्त व्यक्ती राजकारणाच्या स्वच्छतेसाठीच जणूकाही रिंगणात उतरवले आहे. बिना सावळे यांच्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने शिक्षकी राजकारणाला एक चांगले, स्वच्छ आणि निर्मळ वळण लागेल अशी आशा आता जनमानसामध्ये उमटत आहे.

तालुकभरातून संपूर्ण कार्यकारिणीस स्वप्नजा महाजन, मोहिनी चौधरी, रंजना शिंदे, लता धाडवड, स्वाती अडाणे, रंजना काकड, अर्जुन तळपाडे, प्रशांत गवारी, उघडे सोमनाथ, सुयोग वाकचौरे, धनराज वाकचौरे, किशोर खेमनर, दिलीप कढणे, राहुल सोनवने, अमोल सुकटे, संजय बारामते, दीपक बोऱ्हाडे, भगवान भांगरे, प्रल्हाद कोंडार, दुटे , पोपट लोहकरे, रोहिदास जाधव , सदानंद चव्हाण , रुपेश वाकचौरे, पांडे संजय, आहेरकर महादेव, मच्छिन्द्र बांबळे, दीपक सुकटे, गुरुनाथ लांघी, एकनाथ लांघी, प्रतीक नेटके, संतोष फोडसे, रामदास सदगीर, मनोहर पारधी, रघुनाथ उघडे, सुधाकर लींगापुरे, सचिन तपासे, अमोल वेडे, मनोहर आढळ, प्रदीप भांगरे, भरत लोहकरे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी नेते ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नेते बाजीराव मोढवे व केशव कोल्हे, अध्यक्ष सचिन नाबगे, सरचिटणीस प्रतीक नेटके, कार्याध्यक्ष सतीश पटारे, कोषाध्यक्ष मच्छीन्द्र भापकर, नाना गाढवे, योगेश थोरात जिल्ह्यातून शुभेच्छा देण्यास उपस्थित होते.

अशी आहे कार्यकारिणी :

अध्यक्ष- बिना सावळे, उपाध्यक्ष- जयश्री भोसले , दीपक बोऱ्हाडे,
सरचिटणीस- सुयोग् वाकचौरे, सहसरचिटणीस- रंजना काकड, कार्याध्यक्ष- रामदास कारभारी सदगीर, मुख्य सल्लागार- पोपट लोहकरे, सह कार्याध्यक्ष- भगवान भांगरे , कोषाध्यक्ष- राहुल सोनवणे,
जिल्हा प्रतिनिधी- स्वाती अडाणे, सदानंद चव्हाण यांची निवड करणेत अली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *