#coronavirus_MH – १० जून आजची आकडेवारी..! ३२५४ ने वाढ..!

| मुंबई | राज्यात आज १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या ३२५४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ९४ हजार ०४१ इतका झाला आहे. पैकी सध्या ४६ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.(Covid19 statistics)

आज झालेल्या १४९ मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या ८३ मृत्यूपैकी मुंबई ५८, ठाणे ९, नवी मुंबई ५, जळगाव ४, उल्हासनगर ३, वसई विरार २ तर अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याती प्रत्येकी एकाच मृत्यू झाला.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ५ लाख ९३ हजार ७८४ नमुन्यांपैकी ९४०४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६९ हजार १४५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून २७ हजार २२८ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.(Covid19 statistics)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *