| मुंबई | राज्यात आज कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत २८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ८० हजार २२९ इतका झाला आहे. त्यापैकी ४२ हजार २१५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३५ हजार १५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईत आतापर्यंत ४६ हजार ८० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १८ हजार ७७८ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २५ हजार ७६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत १५१९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबईत आज ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात ११ हजार ८७७ रुग्ण असून त्यापैकी ७ हजार १४० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात आज ३० जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ९०५१ रुग्ण असून त्यापैकी ४ हजार ८९३ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात आज १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईनंतर पुण्यात आतापर्यंत ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये ८९६ रुग्ण असून त्यापैकी ४१३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत आणि १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये रुग्णांची संख्या १३६७ वर पोहचली आहे. त्यापैकी ३०८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत आणि नाशिक जिल्ह्यात ८१ रुग्णांचा बळी गेला आहे. औरंगाबादमध्ये ५४३ अँक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूरातही ५५१ अँक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ९४ जणांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.८१ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्युदर ३.५५ टक्के इतका आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .