#coronavirus_MH – ५ जून आजची आकडेवारी..! २४३६ ने वाढ..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत २८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ८० हजार २२९ इतका झाला आहे. त्यापैकी ४२ हजार २१५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३५ हजार १५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबईत आतापर्यंत ४६ हजार ८० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १८ हजार ७७८ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २५ हजार ७६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत १५१९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबईत आज ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात ११ हजार ८७७ रुग्ण असून त्यापैकी ७ हजार १४० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात आज ३० जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ९०५१ रुग्ण असून त्यापैकी ४ हजार ८९३ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात आज १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईनंतर पुण्यात आतापर्यंत ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये ८९६ रुग्ण असून त्यापैकी ४१३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत आणि १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये रुग्णांची संख्या १३६७ वर पोहचली आहे. त्यापैकी ३०८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत आणि नाशिक जिल्ह्यात ८१ रुग्णांचा बळी गेला आहे. औरंगाबादमध्ये ५४३ अँक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूरातही ५५१ अँक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ९४ जणांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.८१ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्युदर ३.५५ टक्के इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *