#coronavirus_MH – २२ जून आजची आकडेवारी..! ३७२१ ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात ३७२१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६२ जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ झाली आहे. यापैकी ६७ हजार ७०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात सध्याच्या घडीला ६१ हजार ७९३ अॅक्टीव्ह केसेस आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची लागण होऊन आत्तापर्यंत ६ हजार २८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १ हजार १८२ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज राज्यात ३७२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *