IPL रद्द झाल्यास, क्रिकेटपटूंना बसेल आर्थिक फटका..


दिल्ली : देेशभरात काेराेना व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकसह आयपीएल, वेगवेगळ्या फुटबाॅल लीग अशा माेठ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अथवा लांबणीवर पडल्या आहेत. काेराेनाचा इफेक्ट अर्थव्यवस्थेवर देखील माेठ्या प्रमाणात हाेऊ लागला आहे. काेरोनामुळे लांबणीवर पडलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षांच्या उत्तरार्धात कार्यक्रमपत्रिकेत स्थान दिले तरच होऊ शकेल.

परंतु आंतरराष्ट्रीय मालिकांच्या आव्हानांमुळे ‘आयपीएल’ न झाल्यास खेळाडूंना मानधन देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. त्याचा फटका स्थानिक क्रिकेटपटूंना बसणार आहे, असल्याचे भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे म्हणने आहे आहे. त्यामुळे हा खेळाडूंसाठी एक इशाराच म्हणावा लागेल.

आयपीएलचा हंगाम सुरू होण्याच्या एक आठवडा पुर्वी खेळाडूंना मानधनाच्या १५ टक्के रक्कम मिळते. मग स्पर्धा चालू असताना ६५ टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित २० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर निर्धारित दिवसांमध्ये दिली जाते. ‘बीसीसीआय’च्या मार्गदर्शक सूत्रांनुसार अद्याप कोणत्याही खेळाडूला पैसे देण्यात आलेले नाही,” असे ‘आयपीएल’शी निगडित सूत्रांनी सांगितले.

‘आयपीएल’स्पर्धा न झाल्यास कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंनाही याचा फटका बसेल, असे भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *