एकटेपणा वाटत असेल तर करा इथे फोन..!
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले दोन टोल फ्री क्रमांक..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल 

मुंबई : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रविवारी दुपारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनमध्ये घरातील हिसांचार आणि मानसिक संतुलनामुळे वाढणाऱ्या घटनावर प्रकाश टाकला. यावेळी ते म्हटले की, लॉकडाउनमुळे घराघरांत हिंसाचार वाढत आहे. महिलांवर आत्याचार वाढला आहे. राज्यात मी हे खपवून घेणार नाही. त्यामुळे महिलांच्या रक्षणासाठी 100 क्रमांकाची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडल्यास महिलांनी या क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी, एकटेपणा टाळण्यासाठीही दोन क्रमांक मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महापालिका आणि बिर्ला यांची संयुक्त सेवा असून त्यासाठी 1800 120 820050 हा क्रमांक आहे. तर आदिवासी विभागाकडून तसेच प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला यांच्याकडूनही सेवा देण्यात येत आहे. त्यासाठीचा क्रमांक 8211 1800 102 4040 असा आहे. घरात राहून आपल्याला मानसिक स्वास्थ बिघडल्याचं किंवा एकटेपणा जाणवत असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *