राज्यपाल नियुक्त आमदारकीला तूर्तास ब्रेक..?

| मुंबई | विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ३ आॅगस्टपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. अधिवेशन लांब असल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या शिफारशी इतक्या लवकर केल्या जाणार नाहीत. शिफारशींवर अधिवेशनापूर्वी निर्णय घेणे राज्यपालांना बंधनकारक असते. कोरोना पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यपाल-सरकार यांच्यात संघर्ष होऊ शकतो त्यामुळे निवड टाळली जाईल, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या मुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरूद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *