अनलॉक १ अंतर्गत शिक्षकांनी उपस्थित राहणे बाबतचा निर्णय तत्काळ रद्द करा..!
पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी..!

| मुंबई | नुकताच ०४ जून २०२० रोजी शासनाचे मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांनी पत्र काढून ई कंटेंट, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी शिक्षकांना शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात बोलाविण्याचे अधिकार सर्व मुख्याध्यापकांना दिले होते.  एकीकडे प्रायव्हेट कार्यालयात १० टक्केच कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली असून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरातून व्हॉट्स अप आणि ईमेल चा वापर करून शासकीय कामकाज करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. मग शिक्षकांनी का म्हणून शाळेत जाऊन काम करावे, तेही विद्यार्थी नसताना?  ४ जून २०२० चा निर्णय जाहीर होताच सर्वच शिक्षकांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात यावे असा वटहुकूम मुख्याध्यापकांनी जाहीर केला असल्याची माहिती मुंबई कार्याध्यक्ष आणि कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख श्री.सतीश ठाकरे यांनी दिली आहे, त्याऐवजी शिक्षकांना इतरांप्रमाणे घरी राहूनच काम करण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी संघटनेने निवेदन दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 संबंधित परिपत्रकाचा ज्याला जसा योग्य वाटेल तसा अर्थ लावला जात आहे.  मुळात ज्यांच्या १०वीच्या उत्तरपत्रिका अजून ताब्यात घेतल्या नसतील त्यांनी शाळा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन ते ताब्यात घेऊन घरून ही तपासणी होऊ शकते. जवळपास सर्व शिक्षकांच्या इयत्ता १०वी उत्तरपत्रिका तपासणीचे काम झाले आहे. इयत्ता ९वी चा निकाल आणि ई कंटेंट सुद्धा घरूनच तयार करता येऊ शकतो, मग शाळेत – कनिष्ठ महाविद्यालयात येण्याचा अट्टाहास कशापायी? या निर्णयाला महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई चा तीव्र विरोध असून हा निर्णय रद्द करण्यासाठी संघटना सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे महिला संघटक सौ.सेजल हीवाळकर मॅडम यांनी सांगितले.

तात्काळ हा निर्णय मागे घेऊन शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय पूर्ववत सुरू होईपर्यंत शिक्षकांना न बोलविता वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मा.मुख्यमंत्री, मा.मुख्य सचिव श्री.अजोय मेहता, मा.शिक्षण मंत्री आदींना निवेदन देण्यात आले आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे मुंबई अध्यक्ष श्री.तानाजी कांबळे यांनी यावेळी सांगितले.

उद्यापासून नवी लेखमाला…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *