| अमरावती | राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना सध्याच्या स्थितीत त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम कुटुंबातील सदस्यांचा औषधोपचार, घर बांधणी तसेच घरातील मुला मुलींचे विवाह आदींसाठी आवश्यक आहे. परंतु भविष्य निर्वाह निधीची टॅब शालार्थ मधून मार्च २०२० पासून बंद करण्यात आल्यामुळे शिक्षकांना त्यांची हक्काची रक्कम मिळविता येत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक अडचणीत आलेले असल्यामुळे शासनाने ही टॅब तातडीने सुरू करावी अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात सध्या लॉक डाऊन मुळे अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देखील अनियमित स्थितीत आहे. काही ठिकाणी लॉक डाऊनला शिथिलता असल्यामुळे शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधी खात्यातील काही रक्कम परतावा आणि निपरतावा यासाठी अर्ज सादर केले आहेत.
काही कर्मचाऱ्यांचे आई-वडील यांचे आजारपण, कोविड १९ च्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधी उपचारासाठी पैशाची गरज आहे, मुलांचे लग्न,घरबांधणी अशा विविध गोष्टींसाठी शिक्षकांना पैश्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षकांनी ही रक्कम मिळविण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा मयत आहेत त्यांची रक्कम देखील त्यांना किंवा त्यांचे कुटुंबीयांना मिळण्यासाठी अडचण जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची दैनावस्था दूर करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीची टॅब सुरू करण्याची मागणी संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा