भारतीय चिनी उत्पादनावर बहिष्कार घालूच शकत नाहीत, चीनची फाजील मग्रुरी..!

| नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्याच्या गोष्टी चीनकडून सुरू असल्या तरी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका लेखातून करण्यात आला आहे.(china on India’s bycoott china product abhiyan)

सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे.  चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे. सध्या भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. .(china on India’s bycoott china product abhiyan)

ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या लेखात सोनम वांगचूक यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी युट्यूबर एक व्हीडिओ टाकत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची विनंती केली होती. सोनम वांगचूक यांच्यासारख्या व्यक्ती सामान्य भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. सीमेवर भारत आणि चीनदरम्या असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटलं आहे..(china on India’s bycoott china product abhiyan)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *