| नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता आपला रिकव्हरी रेट ३१.७ टक्के आहे. तर या लढाईत आपला मृत्यू दर जगात सर्वात कमी आहे. मंगळवारी आपला मृत्यू दर जवळपास ३.२ टक्के एवढा होता. अनेक राज्यांत तर हा दर याहीपेक्षा कमी आहे. तसेच जगातील मृत्यूदर हा ७ ते ७.५ टक्क्यांच्या मधे आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उत्तम मॉनिटरिंग सिस्टम तयार केली जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर आठवड्याला २०० कोरोना टेस्ट अनिवार्य असतील. विशेष म्हणजे, या टेस्ट ज्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत, अशांच्या केल्या जातील. यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात सामान्य माणसांमध्येही कोरोना व्हायरस आहे की नाही? याची तत्काळ माहिती मिळवता येईल. तसेच यानंतर त्याच्यासाठी महत्वाची पावले उचलली जातील. देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप यांसारखी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट यापूर्वीच अनिवार्य करण्यात आलेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७०,७५६ वर पोहोचली आहे. यांपैकी २२४५४ लोक ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर देशात एकूण ४६००८ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे २२९३ जणांचा मत्यू झाला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा