
| मुंबई | जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे.
कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजताची असेल.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या वेळापत्राकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूदाबी आणि १२ सामने शारजामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने साखळी सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक नंतर जाहीर कऱण्यात येणार आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री