
| नवी दिल्ली | देशात सामान्य रेल्वे सेवा सध्या तरी सुरु करण्यात येणार नाही. रेल्वेने ३० जून किंवा त्याआधी प्रवास करण्यासाठी बुक केलेली सर्व तिकीटं कॅन्सल केली आहेत. ३० जूनपर्यंत बुक करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे रिफंड करण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्व स्पेशल ट्रेन्स आणि श्रमिक स्पेशल ट्रेन्स आपल्या नियोजित वेळेनुसार सुरु राहणार आहेत.
रेल्वने याआधी १७ मेपर्यंत रेल्वेची तिकीटं कॅन्सल केली होती. आता रेल्वेने ३० जूनपर्यंत सर्व तिकीटं कॅन्सल करणार असल्याची घोषणा केली आहे. देशात लॉकडाऊन सुरु असून या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. १२ मे रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा १७ मे नंतर सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. १८ मेपासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनआधी बुक करण्यात आलेली ९४ लाख तिकीटं रेल्वेने कॅन्सल केली असून १४९० कोटी रूपये ग्राहकांना परत केले आहेत.
सरकारने कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी सामान्य रेल्वे सेवा बंद केल्या आहेत. परंतु, सर्व स्पेशल आणि श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु राहणार आहेत. रेल्वेच्या आदेशात सांगण्यात आलं की, ‘एक मेपासून सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेन सेवा आणि १२ मेपासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेन सुरु राहणार आहेत.’
- अंशदायी पेन्शन योजना आणि खाजगीकरणा विरोधातील लढा तिव्र करा. -अविनाश दौंड
- शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!
- राज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..!
- राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!
- तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय हे सरकार..
- या बँकेत बंपर भरती, करा असा अर्ज..!