खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा सन्मान !

| अलिबाग / शैलेश चव्हाण | रायगड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाविरुध्द पोलिस, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, तसेच प्रशासकीय कार्यभाग सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी रात्रीचा दिवस करून कोरोना महामारी विरुध्द लढत आहेत. त्यात भरीसभर जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला ह्यात प्रचंड वित्त हनी झाली मात्र प्रशासनाच्या सुयोग्य कार्यप्रणाली मुळे जिल्ह्यात जीवित हनी टळली हीच बाब विचारात घेऊन प्रशासकिय ह्या योद्धाचा गौर करणे महत्वाचे होते.

रायगडचे विद्यमान खासदार सूनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे जिल्हाधिकारी निधी चौधरी , आरोग्य विभागातील रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गवई , तसेच उप विभागीय पोलिस अधिक्षक सोनाली कदम यांना शाल व श्री फळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन गौरवण्यात आले.

प्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस आशिष भट , जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण तसेच, जिल्हा मुख्य संघटक ऋषिकांत भगत व संजोग पालकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्याना गौरवण्यात आले. आपण समाजाप्रती करत असलेल्या कामाला पूर्णत्व आणण्याच्या दृष्टीने हा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *