आय पी एल चे आयोजन करणे ही प्राथमिकता, आशिया कप स्पर्धा रद्द – सौरभ गांगुली

| •मुंबई/क्रीडा प्रतिनिधी• | सप्टेंबरमध्ये हाेणारी आशिया कप स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली. यंदा पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते. मात्र, भारताने कोरोना प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यक्त केल्यानंतर यूएईमध्ये त्याच्या आयोजनाची चर्चा होती. परंतु ती रद्द करण्यात आली आहे; स्पर्धा रद्द रद्द होण्यामागचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनीने म्हटले की, आम्हाला आशियाई क्रिकेट संघटनेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मते, प्रत्येक मालिकेत एक दिवस-रात्र कसोटीचे आयोजन करावे. अशा क्रिकेटमुळे कसोटीची लोकप्रियता वाढेल. ज्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्यासाठी आकर्षित होतील. गांगुलीने म्हटले की, देशात आयपीएलचे आयोजन करण्याची आमची प्राथमिकता आहे. श्रीलंका, यूएई, न्यूझीलंडने या टी-२० लीगच्या आयोजनासाठी प्रस्ताव दिला आहे. आयपीएल विदेशात होईल, या गोष्टीचे गांगुलीने खंडन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *