अन्यथा पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल..!

| मुंबई | महाराष्ट्रात अनलॉक १ करण्यात आलं आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉक होताच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. त्यामुळे गर्दी झाली तर पुन्हा एकदा नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.(otherwise there will be lockdown again)

लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येणार आहे. परंतु संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे विनाकारण गर्दी करु नका. मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करु नका. गर्दी होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कुठेही गर्दी होता कामा नये, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील जनता सरकारचं ऐकते आहे. सरकार जनतेसाठीच ही पाऊलं उचलत असल्याचं जनता जाणते. आतापर्यंत लोकांनी सहकार्य केलं आहे. यापुढेदेखील जनता सरकारच्या सर्व सूचनांचं पालन करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.(otherwise there will be lockdown again)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *