मुंबईत शिक्षकांना वर्क फ्रॉम होम ला परवानगी..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबईची मागणी मान्य..

| मुंबई | राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश असूनही महानगरपालिका शाळेत आणि काही माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्तीने बोलाविले जात होते. उपस्थित न राहिल्यास वेतन कापण्याची धमकीवजा तोंडी सूचना ही देण्यात येत होत्या. मुळात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन अध्ययन- अध्यापन आणि शालेय कामकाज घरात बसून ही करू शकतात. एप्रिल महिन्यापासून शिक्षक ऑनलाईन अध्यापनाचे आणि लिपिक वर्ग ऑनलाईन वेतन काढण्याचे कार्य करीत आहे. असे असताना सुद्धा शासनाचे आदेश नसतानाही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी दबाव टाकला जात होता अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना सहकार्याध्यक्ष श्री. सर्वेश मिश्रा यांनी सांगितले.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची परवानगी मिळावी यासाठी संघटनेने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मुंबई महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सतत वरील मागणी पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.

अखेर मुंबईतील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, महानगरपालिका शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष न बोलविता घरातूनच वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश महानगरपालिका शिक्षणाधिकारी यांनी दिले असून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ची मागणी मान्य झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष श्री.तानाजी कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना ही कायम शिक्षकांच्या न्याय व हक्कांसाठी तत्पर असून कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काहीही समस्या असल्यास संघटनेला संपर्क करण्याचे आवाहन विभाग संघटक सौ.सेजल हिवाळकर, श्री.युवराज कलशेट्टी, श्री.उमेश मिश्रा, श्री.संजय केवटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *