पोलिस कोरोनाच्या विळख्यात ..!| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३०९४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १२३३ नवीन रुग्ण वाढले. मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, पुणे या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

या लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचं चिंता वाढल्या आहेत. आतापर्यंत ५१ पोलीस अधिकाऱ्यांना आणि ४८० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाकाबंदी, गस्त यामुळे पोलिसांची लोकांशी थेट संपर्क होत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा प्रशासनासाठी देखील चिंतेचा विषय बनला आहे.

राज्यातील पोलिसांवर अतिरिक्त ताण येतो आहे. लॉकडाऊनमुळे बंदोबस्त, नाकाबंदी आणि आता मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सुरु असलेली एकूण कामं यामुळे पोलिसांवर ताण वाढतो आहे.

आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

५ पोलिसांचा मृत्यू 

  • मुंबई पोलीस दल – वाकोला पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर
  • मुंबई पोलीस दल – हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे
  • मुंबई पोलीस दल – कुर्ला वाहतूक विभाग, पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे
  • पुणे पोलीस दल – फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे
  • सोलापूर पोलीस दल – एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *