उल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..

| उल्हासनगर | उल्हासनगर कँप ३ येथील काही वर्षांपूर्वी इएसआयसी कामगार रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आय.आय.टी. कडून सादर करण्यात आला होता. मोडकळीस आलेल्या इमारती जागी नवीन ‘सुपर_स्पेशालिटी_रुग्णालय ‘ उभे रहावे ह्यासाठी केंद्राकडे सातत्याने स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. या मुळे रुग्णालयासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान, २०१९ मध्ये नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत असेलेले रुग्णालय स्थलांतरित करणे गरजेचे असल्याने अनेक वेळा निविदा काढून अखेर ESIC ने रुग्णालयाकरिता नवीन जागा निश्चित केली असून येत्या महिन्याभरात येथे रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात येईल.

तसेच रुग्णालयाच्या पाडकामासाठी उल्हासनगर मनपाची मंजुरी आवश्यक असल्याने मनपा आयुक्तांना यासाठी ” ना हरकत प्रमाणपत्र ” लवकरात लवकर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या, त्या दृष्टीने अखेर आज रुग्णालयाच्या पाडकामास महापालिकेकडून हिरवा कंदील देण्यात आला. काल पार पडलेल्या आढावा बैठकीत तातडीने रुग्णालयाच्या पाडकामास सुरवात करण्याचे आदेश मनपाला देण्यात आले आहेत.

असे असेल नवे हॉस्पिटल :

१०० बेडच्या या रुग्णालयाकरिता १ लाख ८० चौरस फूट क्षेत्र प्रस्तावित असून यामध्ये रुग्णालयात पुर्णवेळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असेल. स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, फार्मसी, शस्त्रक्रिया विभाग तसेच सर्व अत्याधुनिक व सोयी सुविधांनी सज्ज असे हे कामगार रुग्णालय लवकरच उल्हासनगर आणि आसपासच्या उपनगरांच्या कामगार रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी येत्या जून २०२३ पर्यंत सज्ज होईल, अशी ग्वाही ई.एस.आय.सी. तर्फे देण्यात आली आहे. रुग्णालयाचे पाडकाम करून दोन महिन्यात रुग्णालयाच्या पुर्नबांधणीस प्रारंभ होणार आहे.

काल पार पडलेल्या बैठकीस खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सह उल्हासनगर मनपा विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण अशान, उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे तसेच ESIC चे संचालक प्रणय सिन्हा, आरोग्य अधिकारी सिनिअर मेडिको डॉ.कांबळे, उपसंचालक आशुतोष गिरी, उपवैद्यकीय प्रतिनिधी सतीश ताजवे व ESIC चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.