गुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..!

| सोलापूर | शिक्षकांचा समाजात कायम आदर आहे. ज्ञानदानाच्या पवित्र कामाबरोबर राष्ट्राचे भविष्य त्यांना घडवावे लागेल. खर्‍या अर्थाने केवळ एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्याचे आयुष्य घडवतो. शिक्षक हा समाजाची कोनशिला आहे. एक शिक्षक आयुष्याच्या शेवटपर्यंत मार्गदर्शकाची भूमिका निभावतो आणि समाजाला मार्गदर्शन करत राहतो, त्यामुळे शिक्षकास समाजात उच्च स्थान दिले जाते. शिक्षक आपल्या आचरणातून कायमच समाजाला आदर्शाचे बीज देत असतो. अशीच एक घटना दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील अजय साळवे हे शिक्षक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरेवाडी येथे घडली आहे.

सध्या कोरोनाशी जग युद्ध करत असताना आपण ज्या विध्यार्थी यांना शिकवतो ते विद्यार्थी व पालक यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. या उदात्त हेतूने अजय साळवे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांना कोरोना सारख्या महामारीला सामोरे कसे जायचे जनजागृती करुन पालकांना वाफ घेण्याच्या मशीन चे वाटप केले. वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवतो. उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा या उक्ती प्रमाणे वाफ घेण्याचे फायदे सांगून मशीन कशी वापरायची हे सांगण्यात आले.

अजय साळवे गुरुजी यांच्या या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र सस्ते, केंद्र प्रमुख कांतीलाल उरवणे, शिक्षक नेते मधुकर वनसाळे, विठ्ठल काळे, संभाजी फुले, पोपट भोसले, बाबासाहेब झोडगे, अंकुश सावंत, वसंत अवघडे विठ्ठल सावंत, मोहन बाबर, अशोक रुपनवर, दत्तात्रय झेंडे, शरद रुपनवर, नवनाथ धांडोरे, अमोल शिंदे, नवनाथ माने, आनंद सर्जे, गल बनसूडे, राजेंद्र बोराटे, दादासाहेब साळवे, विजय साळवे, अरुण राठोड, दिगंबर गायकवाड यांच्यासह वेगवेगळ्या स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *