विशाल भुजबळ यांना भारत गौरव युवा पुरस्कार २०२१ पुरस्कार ..!

| पुणे | नारायणगावचे सुपुत्र , रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य, युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल भुजबळ यांना भारत गौरव युवा पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले.

भारत गौरव अवॉर्ड फाऊंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी नवोदीत उद्यमशील युवक, तसेच समाजकार्यात भरीव योगदानाबद्दल युवा कार्यकर्तांना प्रोत्साहान मिळावे म्हणून भारत गौरव युवा पुरस्कार दिला जातो. देशभरातून मानव विकासाच्या विविध क्षेत्रातील १२ युवकांना आज दिल्लीतील शंग्रीला एरो इंटरनॅशनल हॉटेलच्या भव्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे व विशाल भुजबळ यांना गौरविण्यात आले.

या वर्षीचा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री कौशल किशोर तथा फग्गुन सिंग कुलस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. श्री. विशाल भुजबळ यांना केंद्रीय मंत्री फग्गुन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारत गौरव अवॉर्ड फाऊंडेशन ने श्री. भुजबळ यांचा सन्मान करत
‘भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये तरुणाईचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, सहभाग आहे. ‘ असे म्हटले आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या तरूणाईचे श्री. भुजबळ प्रतिनिधीत्व करत आहेत असेही या सन्मान सोहळ्यात म्हटले आहे.

मानव विकास व मानवी मूल्यांच्या पेरणीसाठी राजकारणात काळाची गरज आहे, युवक हे देश विकासाचे महत्त्वपूर्ण अंग आहेत. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक युवकांना एकत्रित करत गेलो तर युवकांकडून व्यापक स्वरुपामध्ये देशसेवा घडून येईल असे प्रतिपादन श्री. भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले आहे.

राष्ट्रीय मराठा मिशनचे अध्यक्ष कमलेश पाटील , भारत बोधिसत्व परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मडके, पानिपत विजय महोत्सव समितीचे कमलजीत महल्ले , सक्षम भारत युवा प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष अमील पाटील वेळूकर तसेच कार्यक्रमाचे विशेष पाहणे ईथियोपियाचे राजदूतांनी श्री भुजबळ यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *