
| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. या मुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. भारतीय टीम 20 खेळाडू आणि चार स्टॅण्डबाय खेळाडूंना घेऊन इंग्लंडला रवाना झाली आहे.
फायनलसाठी भारतीय टीम :
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज
साऊथम्पटनमध्ये फायनलच्या प्रत्येक दिवशी 70-80 टक्के पावसाचा अंदाज आहे. तसंच खेळपट्टी जलद असून त्यावर बाऊन्सही असेल असं साऊथम्पटनच्या पिच क्युरेटरने सांगितलं आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टी यामुळे जडेजा आणि अश्विन यांच्यापैकी एकाच स्पिनरना खेळवायचं का? तसंच इशांत शर्माला संधी द्यायची का मोहम्मद सिराजला? हे प्रश्न विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!