अहमदनगर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अन्यायकारक NPS योजनेवर टीकास्त्र..!

| अहमदनगर | अहमदनगर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अन्यायकारक NPS योजनेवर टीकास्र सोडत जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांना त्रुटींचे निवेदन दिले. काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, अहमदनगर संघटनची जिल्हा कार्यकारिणी बैठक नगर येथे पार पडली. बैठकीत झालेल्या NPS बाबतचा सार लक्षात घेऊन त्याप्रमाणे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

सदरचे निवेदन अवलोकन करून तालुका कार्यकारिणीने तालुकास्तरावर निवेदन दोन दिवसात द्यावे, त्याप्रमाणे नियोजन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर निवेदनामध्ये dcps कपात चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या 15 वर्षातील प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक कर्मचा-याच्या सर्व हिशोबाच्या पावत्या मिळाव्यात; की जेणेकरून हिशोब व व्याज ताळमेळ जुळेल, Nps मध्ये dcps जमा रक्कम ओपनिंग बॅलंन्स दाखविण्याची हमी द्यावी, Nps योजनेची पुर्ण माहिती उदा. व्याज, पैशांची जबाबदारी, केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या Nps मध्ये फॅमिली पेंशन, ग्रॅच्युइटी मिळेल काय, आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांचा ओपनिंग बॅलंन्स कसा घेणार इ. बाबींसंबंधी मागणी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत वरील बाबींची पुर्तता होत नाही, तोपर्यंत कोणीही Nps चे फॉर्म भरू नयेत, असे संघटनेमार्फत आवाहन करण्यात आलेले आहे.

आपल्याला एकाच वेळी वज्रमुठीने विरोध करून हा विषय आपल्याला यशस्वीपणे परतवून लावावा लागेल, असे बैठकीत ठरविण्यात असल्याची माहिती संघटनेने दिली. या बैठकीला बाजीराव मोढवे, राजेंद्र ठोकळ, सचिन नाबगे, योगेश थोरात, प्रतीक नेटके, ज्ञानेश्वर सोनवणे, सय्यद तौसिफ, शिवाजी आव्हाड, निलेश हारदे, शरद कोतकर, मच्छिंद्र कदम, विनायक क्षिरसागर, अरविंद थोरात, राजेंद्र ठुबे, नाना गाढवे, किशोर जगताप, शरद गावडे, सदानंद चव्हाण, रोहिदास जाधव, निलेश राजवाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *