अजबच : या मनपात पत्नी महापौर तर पती आहेत विरोधी पक्षनेते..!

| जळगाव | जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली.

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. मात्र उलथापालथानंतर जळगावात एक अजब राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.

जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत, तर त्यांचे पती सुनील महाजन विद्यमान विरोधी पक्षनेते आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 2018 साली झालेल्या निवडणुकीत 75 पैकी 57 जागा जिंकून भाजपने जळगाव महानगरपालिकेवर एकहाती अंमल प्रस्थापित केला होता. मात्र अडीच वर्षानंतर शिवसेनेने भाजपचे अनेक नगरसेवक गळाला लावत महापौरपद मिळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *