अजितदादांच्या सततच्या जपामुळे ‘ पडळकरांना ‘ आमदारकी..!

| पुणे / लोकशक्ती ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीने त्या पत्राची दखल घेत गोपीचंद पडळकर यांना पत्र लिहून काही गोष्टी आठवणीत आणून द्याव्याशा वाटतात. त्यामुळे हे पत्र लिहित असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे पाटील त्यांनी हे पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे गोपीचंद पडळकर यांच्यावर खरमरीत टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहितांना छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज तसेच महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला होता.

त्यालाच उत्तर देताना या थोर व्यक्तींची आठवण काढल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करत ही आठवण फक्त तोंडदेखलेपणाची आहे, असं म्हणत आपण ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करता ते गोळवलकर, हेडगेवार यांच्या विचाराने विषमता, जातीयद्वेष, मनुवादी मानसिकतेतून काम करतात, अशा प्रकारची टीका केली आहे.

त्याचबरोबर, ‘गेल्या सव्वा वर्षांपासून अजितदादाच्या नावाचा दिवस-रात्र जप आपण करत आहात, अजित दादा हे फळ देणारे झाड आहे. त्याला तुम्ही दगड मारला तरी ते फळ देणार. नाहीतर डिपॉझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी कशी मिळाली असती? हे सर्व आपण दिवस-रात्र अजितदादाचा जप केल्यामुळेच होत आहे’, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांना सणसणीत टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर हे बिरोबाची शपथ घेऊन बहुजन समाजाचे दैवत बिरोबा देवाला फसवणारं व्यक्तिमत्व आहे. अशाप्रकारची टिप्पणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. शिवाय, अजितदादांचं नाव घेऊन आपल्याला आमदारकी मिळाली तसं बिरोबाच्या शपथेला जागून आपण मोदींचं नाव घेत राहाल तर केंद्रात खासदारकी मिळण्याचीही संधी आहे. असं म्हणत महापुरुषांच्या विचारांची आठवण आपण करून द्यायची गरज नाही, अजितदादांच्या रक्तातच महापुरुषांच्या विचारांचा वारसा आहे. अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांना आकाश झांबरे या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पत्र लिहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *