
| पुणे | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा पुणे यांनी वारंवार जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन एनपीएस चे CSRF फॉर्म भरण्याच्या सक्तीला विरोध दर्शवला होता व डीसीपीएस धारकांचे म्हणणे मांडले होते.
त्याला अनुसरून काल ७ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे संघटनेच्या विविध न्याय मागण्यांसंदर्भात मार्गदर्शन मागवले आहे. संघटनेच्या मागण्यांचा प्रामुख्याने विचार करून जिल्हा शाखेच्या पत्राचा आधार घेऊन हे मार्गदर्शक मागितले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष गदादे दिली आहे. तरी सर्व डीसीपीएस धारकांना वरिष्ठांच्या दबावाला बळी पडू नये व CSRF फॉर्म भरून देऊ नयेत, असे आवाहन पेन्शन संघटनेच्या जिल्हा शाखेने केले आहे.
सदर मागण्यां संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, सरचिटणीस वैभव सदाकाळ, कार्याध्यक्ष योगेश ठोसर, कोषाध्यक्ष विनायक शिंदे, मीडिया प्रमुख सोमनाथ कुदळे तसेच सर्व जिल्हा कार्यकारणी सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकारणी यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. वेळ प्रसंगी आंदोलनाचा देखील इशारा दिला होता.
- अंशदायी पेन्शन योजना आणि खाजगीकरणा विरोधातील लढा तिव्र करा. -अविनाश दौंड
- शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!
- राज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..!
- राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!
- तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय हे सरकार..