| मुंबई | शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने सल्लागार, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य अविनाश दौंड हे नुकतेच ३६ वर्षे शासकीय सेवा प्रामाणिकपणे बजावून पर्यवेक्षीय पदावरून निवृत्त झाले. काल दिनांक २ सप्टेंबर रोजी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यगौरव समारंभात पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते अविनाश दौंड यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सीटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी एल. कराड यांनी दौंड यांचा कामगार चळवळीतील मोठा अनुभव पाहता त्यांनी फक्त सरकारी कर्मचारी संघटनेचे काम न करता यापुढे सर्व श्रमिक वर्गासाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी अविनाश दौंड यांची सरकारी कर्मचारी चळवळीला नितांत गरज असुन यापुढेही त्यांनी सातत्यपूर्ण काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दौंड हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असुन राज्य कामगार कल्याण मंडळाच्या अनेक कार्यक्रम आणि उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग होता. यापुढेही त्यांनी मंडळाला मार्गदर्शन करावे अशी सूचना केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयाचे संचालक रुपेंद्र मोरे यांनी दौंड यांनी ३६ वर्षे प्रामाणिकपणे शासकीय सेवा बजावून पर्यवेक्षीय पदावरून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी ३० वर्षे स्थानिक, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि आता राष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये अतिशय जबाबदारीने काम केले आहे. या कालावधीत त्यांनी नेहमीच कामगारांचे प्रश्न कुशलतेने मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.यापुढे सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आम्ही करुन घेवु असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास काटकर यांनी दौंड यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोकराव दगडे यांनी दौंड यांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाची प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग.दि. कुलथे यांनी सत्कारमूर्तीच्या सातत्यपूर्ण भरीव कार्याची स्तुती केली. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे व्यवस्थापक मनोज वैद्य , महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष मारुती शिंदे, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे , माध्यमिक शिक्षक कर्मचारी संघटनेचे नाना पुंदे आणि शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयीन कर्मचारी संघटनेचे सचिव पालांडे यांनी दौंड यांच्या कार्याचा समग्र आढावा घेऊन गौरव केला.
कार्यक्रमात दौंड यांच्या समग्र कारकीर्दीचा आढावा असलेल्या “चैतन्य प्रकाश” या अविनाश दौंड गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन तर सौ. ज्योती अविनाश दौंड यांचा सौभाग्य लेणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि मुंबईतील विविध खाते संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटना सरचिटणीस बाळकृष्ण तुरुंबाडकर, आभार प्रदर्शन अध्यक्ष संतोष डोके, संचलन कमलेश खानविलकर तर मानपत्राचे वाचन नंदकिशोर सोनावणे यांनी केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
- निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?
- बारामतीमधून ‘शरद पवार’ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
- ‘एका व्यक्तीची इच्छा..’; संविधान बदलण्यासाठी ‘रामायण’ फेम गोवील यांचा पाठिंबा?
- तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष
- ‘तारक मेहता…’ मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!
- नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? ‘या’ दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
- रेल्वेचे तिकीट सामान्य पण… तरीही प्रवास मात्र “स्लीपर” चा
- माढ्याचा कोंडी फुटली, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी फुंकणार, शरद पवारांनी गणित जुळवलंच!
- बाळासाहेबांचा कायम काँग्रेसला विरोध, मात्र उद्धव ठाकरेंचा काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा, नारायण राणेंचा हल्लाबोल ..
- ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत’, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान
- छगन भुजबळांच्या फार्महाऊसवर ड्रोन उडवणारा ‘तो’ कोण? समोर आली मोठी माहिती