कोरोनाची लस घेऊनही कोरोना होतो? जाणून घ्या लस का घ्यावी..?

| उस्मानाबाद | कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होते का? जर लागण होत असले तर कशासाठी कोरोनाची लस घ्यायाची? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये येतात. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही लस घेतल्यानंतर कोरोना झाला असून कशी काळजी घ्यावी, याबाबत आवाहन केले आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो का? यावर आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, कोरोनावरील लस घेतली म्हणजे नेमके काय होते. तर लस घेतल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुरुवात होते.

ज्यांनी लस घेतली त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजेच आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी शरीरातच पोलिस यंत्रणा तयार होते. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या शरीरात मोठे बळ तयार होते. परिणामी कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव शरीरामध्य होत नाही. कोरोनामुळे माणसांच्या जीविताला धोका होऊ शकतो. तो कोरोनाची लस घेतल्यानंतर कमी होतो. त्यामुळे प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. जे कर्मचारी नियमितपणे नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यांनी तर लस घेणे अनिवार्य आहे. लस घेतली म्हणजे कोरोना होत नाही, असे नव्हे. तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी शरीरात कोरोना ससंर्गाचा फैलाव शरीरात फारसा वाढत नाही. माणसांच्या जीविताला होणारा धोका कमी होतो.

लस घेतल्यानंतरही पाळावे हे सूत्र:

लस घेतल्यानंतरही आपल्याला काही नियम पाळावे लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र हल्ली मास्क वापरण्यास टाळाटाळ केली जात आहे. मास्क न वापरण्याचे गांभीर्य अद्यापही नागरिकांना कळलेले नाही. मास्क वापरणे अनिवार्य आहे. शिवाय बाहेरून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच वारंवार हात सॅनिटाइज करावे लागणार आहेत. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन :

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लस घेतल्यानंतर करोनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये. यासाठी त्यांनी आवाहन केले असून लस घेणे गरजेचे आहे. असे म्हटले आहे. लस घेतल्याने कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव दिसत नाही. शिवाय लस घेतल्यानंतरही नियम पाळावे लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लस घेतली तरी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. वारंवार सॅनिटायझर वापरणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.