कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..!

| ठाणे | कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक खर्च देण्याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील सहा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उचलला आहे. यावेळी या सर्व विद्यार्थ्यांशी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संवाद साधला.

चिराग नगर, ठाणे येथील कु. तन्यया रामचंद्र वाटाणे (वय 9 वर्षे) आणि कु. याशिका रामचंद्र वाटाणे (वय 2 वर्षे), चंदनवाडी येथील कु. कुशल किरण कांबळे (वय 14 वर्षे) आणि कु. किंजल किरण कांबळे, ओसवाल पार्क, माजिवाडा येथील कु. शैलेश राजे या अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराने उचलला आहे. त्यानुसार पुजा शिंदे (विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस), श्रृती कोचरेकर (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस), रविंद्र पालव (सरचिटणीस), भरत सावंत (ज्येष्ठ कार्यकर्ते), समीर पेंढारे (ब्लॉक अध्यक्ष), पल्लवी जगताप (युवती अध्यक्षा, ठाणे), अभिषेक पुसाळकर (विधानसभा अध्यक्ष युवक), नितीन पाटील (परिवहन समिती सदस्य) यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक निधी प्रदान केला.

Leave a Reply

Your email address will not be published.