
| ठाणे | ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे गोरगरीब रुग्णांचे आधारवड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता, डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तर्फे १०० मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यातील पहिल्या टप्प्यातील १६ रूग्णवाहिका, ९ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा विविध मतदारसंघातील आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच यापूर्वी देखील एकूण ३४ रुग्णवाहिका डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून राज्यातील विविध भागांत लोकार्पण करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील रुग्णसेवेकरिता रुग्णवाहिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
सुपूर्द करण्यात आलेल्या रुग्णवाहिका
१. आ.भास्करराव जाधव , गुहागर, जि.रत्नागिरी
२. आ.कैलासजी पाटील, धाराशिव, जि. धाराशिव
3 आ.मंजुळा ताई गावित, साक्री, जि धुळे
4. आ. अनिलजी बाबर , विटा, जि. सांगली
5. आ.कैलासजी अप्पा पाटील, पाचोरा, जि. जळगाव
6 खा. हेमंतजी अप्पा गोडसे, नाशिक, जि. नाशिक
7 मा.आ.पांडुरंगजी वरोरा , शहापूर, जि. ठाणे
8 आ.सुभाषजी साबणे, देगलूर, जि. नांदेड
9 आ.नितीनजी देशमुख , बाळापूर, जि. अकोला.
10. आ.चंद्रकांत ( दादा ) पाटील, मुक्ताईनगर, जि. जळगाव
11. श्री.शिरोळकर/श्री.नागणुरी, बेळगाव आणि सीमा भाग
12.श्री.किरण पांडव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, नागपूर विभाग, ( पूर्व विदर्भ )
13. श्री.राजाभाऊ भिलारे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , पुणे विभाग. ( पश्चिम महाराष्ट्र )
14. श्री. गिरीषजी राजे, विभागप्रमुख, कोपरी, ठाणे.
15. आर.बी.जी. फौंडेशन, नवी मुंबई.
16. मा.ना.श्री.अब्दुल सत्तार, महसूल राज्य मंत्री, सिल्लोड, संभाजीनगर