| नवी दिल्ली | थ्री इडियट्स हा हिंदी चित्रपट ज्यांच्यावर आधारीत होता अशा सोनम वांगचुक यांनी प्रचंड कडाक्याच्या थंडीतही देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या सैन्याना सौर उर्जेवर आधारीत उबदार तंबू बनवले आहेत या तंबूंच्या माध्यमातून कडाक्याच्या थंडीतही उब मिळणार आहे.
संशोधक व नवनिर्मितीचे ध्यास घेतलेले सोनम वांगचूक यांनी भारतीय लष्कराला लेह लडाख शीत प्रदेशातही सामान्य तापमानात राहता येईल अशा तंबूची निर्मिती केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सौर उर्जेवर आधारीत तंबू उभारले जात असल्याचे सोनम वांगचूक यांनी समाज माध्यमांना माहिती दिली.
रात्री १० वाजता तंबू बाहेरील तापमान हे -१४ अंश सेल्सियस असताना तंबू मध्ये १५ अंश सेल्सियस तापमान स्थिर करण्यात येणे शक्य आहे . या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये केरोसिनचा वापर टाळता येणार आहे. प्रदूषण टाळणे शक्य होणार आहे.
या तंबू मध्ये ८ ते १० सैनिक राहू शकतात. या तंबूच्या साहित्याची ने -आण करणे सोपे आहे. याच्या प्रत्येक भागाचे वजन ३० किलोग्रॅम पेक्षा कमी आहे.पूर्णतः भारतीय बनावटीचे व लडाखमध्ये बनवलेले सर्व साहित्य आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .