
| जालना | नाफेड अंतर्गत नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत होत असलेली हरभरा पिकाची खरेदी (ता.24) सोमवार पर्यंत सुरू राहणार असून ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले हरभरा पिक खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन यावा.
नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत ऑनलाइन करण्यात आलेल्या 475 शेतकऱ्यांपैकी 230 शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर विक्री केला असून 3295 कुंटल हरभरा पिकाची खरेदी करण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील खरेदी करण्यात आलेल्या हरभरा पिकाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ यांनी दिली.
उर्वरित ऑनलाईन केलेल्या 245 शेतकऱ्यांनी आपला हरभरा शेतीमाल नानसी पुनर्वसन येथील शासकीय खरेदी केंद्रावर (ता.24) सोमवार पर्यंत घेऊन यावा. खरेदी ची तारीख कुठल्याही कारणास्तव वाढवण्यात येणार नसल्याने खरेदी केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने शेतकर्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली अर्बन को-ऑपरेटिव पतसंस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा चे संचालक सतीशराव निर्वळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!