| ठाणे | ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्प उभा केला असून या प्रकल्पाचे उदघाटन आज माझ्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका असून ठाणे पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर येथे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे 3.2 टन प्राणवायू निर्माण होणार आहे. अवघ्या १५ दिवसात युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मी.स्वतः व महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. ”ठाणे पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमधील ३०० ऑक्सिजन बेडना या प्रकल्पाचा फायदा होणार असून अजून २१५ बेडना लागणारा ऑक्सिजनची निर्मिती देखील दुसऱ्या प्रकल्पमध्ये करण्यात येणार आहे.
तसेच छत्रपती शिवाजी रुग्णालयात देखील जवळपास ६५० बेडना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. एफडीए प्रमाणित पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये हवेतील ऑक्सिजन विशिष्ट पध्दतीने टाकीमध्ये साठवून सदर हवेतील अशुध्द घटक वेगळे करण्यात येतात . या ऑक्सिजनची शुध्दता ९३% आहे. दोन्ही प्रकल्पांची उभारणी केल्यावर प्रती दिवस ३५० सिलेंडर इतका ऑक्सिजन निर्माण होणार आहे. एका ऑक्सिजन जनरेशन प्लॅण्टद्वारे ८५० लिटर प्रती मिनिट इतका ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. प्रती दिवस दोन्ही प्लॅण्टद्वारा सुमारे ३.२ टन ऑक्सिजन मिळणे अपेक्षित आहे.
साधारणत : १५० रुग्णांना १० लिटर प्रती मिनिट ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे.
हा प्रकल्प अत्यंत कमी वेळात म्हणजेच १५ दिवसात उभारण्यात आला असून, सदर प्रकल्पाद्वारे निर्माण केलेला ऑक्सिजन पाईप लाईनद्वारे रुग्णालयास पुरविण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या या ०२ ऑक्सिजन जनरेशन प्लॅण्टमध्ये वापरण्यात आलेले कॉम्प्रेसर हे जर्मन मेक आहेत. तसेच यामध्ये वापरण्यात आलेले ऑक्सिजन जनरेटर हे अमेरिकन मेक आहेत. या प्रकल्प उभारणीमुळे ठाणे महानगरपालिकेला ३.२ टन प्रती दिवस ऑक्सीजनची प्राप्त होणार आहे .
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .