हे व्यक्ती पुरवतायेत संपूर्ण ठाणे जिल्ह्याला प्राणवायू..!

| डोंबिवली | ठाणे जिल्ह्यात सध्या जोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून रेमडेसिविर, ऑक्सिजन यांचा अनेक ठिकाणी तुटवडा भासतो आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत डोंबिवलीकर पुन्हा एकदा तारणहार म्हणून उभं राहिला आहे. कारण डोंबिवली आणि अंबरनाथ एमआयडीसीतील भाऊसाहेब चौधरी यांच्या मॉडर्न गॅस कंपनीतून सध्या संपूर्ण जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे. मॉडर्न गॅस कंपनीतून सध्या ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, वसई विरार महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका यांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो आहे.

या महापालिका आणि नगरपालिकांनी उभारलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये पुरेसा प्राणवायू वेळेत पोहोचवण्यासाठी सध्या मॉडर्न कंपनीचे कामगार रात्रंदिवस झटत आहेत. या कंपनीतून दिवसाला ४० ते ४५ टन ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. यामध्ये सर्वाधिक पुरवठा हा ठाणे महापालिकेच्या बाळकुम जम्बो कोव्हीड सेंटरला केला जातो आहे. दिवसाला १५ टन ऑक्सिजन हा एकट्या बाळकुम जम्बो कोव्हीड केअर सेंटरला केला जातोय. तर इतर ठिकाणीही गरजेनुसार ऑक्सिजन पुरवला जातो आहे. दिवसाला ८० ते ९० लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर आणि ८०० ते १००० जम्बो आणि लहान सिलेंडर या कंपनीत भरले जातात. यासाठी तळोजा इथल्या लिंडे कंपनीतून ऑक्सिजन मागवला जातो आणि तो वितरित केला जातो.

या कंपनीचे मालक भाऊसाहेब चौधरी हे डोंबिवली रहिवासी असून शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख असून शिवसेना नेते संजय राऊत यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. मागील ३० वर्षांपासून भाऊसाहेब चौधरी हे या व्यवसायात आहेत. पूर्वी हॉस्पिटल आणि औद्योगिक अशा दोन्ही ठिकाणी ते ऑक्सिजन पुरवठा करायचे. मात्र कोरोना आल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे वैद्यकीय उपयोगासाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला. विशेष म्हणजे भाऊसाहेब चौधरी यांनी कोविड काळात अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मोफत दिले आहेत आणि लॉकडाऊन मध्ये मोफत धान्य वाटप, मदत सुद्धा केली आहे. त्यातही मागच्यावर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी २ ते ३ पट वाढल्याचं ते भाऊ सांगतात. तसंच ऑक्सिजनचा वापर रुग्णालयांनीही जपून करण्याचं आवाहन ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *