भारतच्या माजी क्रिकेट कर्णधाराला हृदयविकाराचा झटका..!

| कोलकत्ता | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल केले आहे.

शुक्रवारी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला असून काही चाचण्या केल्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याचे समजते.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका वृत्तसंस्थने रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. गांगुलीला किती वेदना होत आहेत हे आम्ही तपासत आहोत. यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील असेही रूग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.

जय शहा यांनी केले ट्वीट

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गांगुलीची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. मी त्याच्या कुटुंबीयांशी बोललो असून दादाची प्रकृती स्थिर आहे. तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *