जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करून द्या, CEO आयुष प्रसाद यांच्याकडे लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी..

| भिगवण / महादेव बंडगर / सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना औषधोपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच सर्वसामान्य जनतेला रेमडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा परीषद प्रशासनाने जिल्हा परीषद निधीतुन रेमडीसिवीर खरेदीचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय कौतुकास्पद असुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. याच पाश्वर्भूमीवर जिल्हा परीषद अंतर्गत विविध संवर्गाचे अधिकारी आणि कर्मचारी कोरोना कालावधीत कार्यरत आहेत. त्यामुळे सदर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांना तातडीने उपचार मिळतील असे रुग्णालय अथवा कोवीड सेंटर उपलब्ध होईल अशा रुग्णालयासोबत करार करण्यात यावा. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेळेत उपचार मिळेल.आणि त्यातुनच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रशासनाबाबत आपुलकीची भावना निर्माण होईल. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेखर गायकवाड, राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, किशोर कुलकर्णी, मनोहर वन्नम,सुहास संचेती, विकास पापळ आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *