केंद्राने या निर्णयाला परवानगी दिली तर रेमडेसिवरचा अजिबात जाणवणार नाही तुटवडा..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिडघत आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा रेमडेसिवीर न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर इंजेक्शन खरदे करण्याचा विचार केला असता सिंगापूर, इजिप्त आणि बांग्लादेश मधील कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला पुरवण्यासाठी समंती दर्शवली आहे. या तीन देशांनी महाराष्ट्र राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुरवण्याची तयारी दर्शवल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहे.

राज्यात सध्या कोरोनाची आकडेवारी दिवसाला ६० हजारांच्या घरात पोहचत आहे. राज्य केंद्राकडून होणाऱ्या रेमडेसिवीरच्या साठ्यावर अवलंबून आहे. मात्र केंद्राकडून रेमडेसिवीरचा साठा राज्याला अपूरा पडत आहे. राज्यात दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज केवळ २६ ते २६ हजार व्हायल्स उपलब्ध होत आहेत. सिंगापूर, इजिप्त आणि बांग्लादेश हे देश राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा करायला तयार आहेत. केंद्र सरकारने जर याला लवकरात लवकर परवानगी दिली तर पुढची प्रक्रिया सुरु होऊन राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा भरुन निघेल, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

गेली अनेक दिवस राज्यात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मागणी करत आहे. रेमडेसिवीरच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार केल्याचेही उघडकीस आले. रेमडेसिवीर जास्त किंमतीने विकले गेले. या सगळ्या परिस्थितीत राज्यातील कोरोना रुग्णांची दयनीय परिस्थिती पहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *