| मुंबई | देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत.
वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर हीच परिस्थिती राहीली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे. दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.
..तर राज्यात लोडशेडींग
देशभरात कोशळ्या कमतरता भासत आहे. याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद करण्यात आले आहे. विजेची तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विज निर्मितीची भरपाई होईल. या प्रकल्पातून 60 टक्के तुट भरून निघणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. जर हीच परिस्थिती राहिली शहरी आणि ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागणार आहे. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केलं आहे.
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी 3 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या 3330 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.
कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी 17,289 मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी 11.30 वाजता राज्यात 18,200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.
कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.
वीज संकटाच्या बातम्या निराधार : केंद्र सरकार
देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांनी देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, ते सर्व देशवासियांना आश्वास्त करतायेत की देशातील वीज पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .